Mumbai Local Train 5 January 2025 Updates: मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांपैकी तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉकचा परिणाम पाहायला मिळणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर दुरुस्तीच्या कामांमुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवरही प्रवाशांचा खोळंबा असल्याचं चित्र दिसत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी मुंबईकरांना गर्दीतून प्रवास करावा लागणार आहे.


आज हार्बर मार्गावर असा आणि कुठे असेल बदल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे? : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर आज मेगाब्लॉक असेल. 


किती वेळ? : एकूण पाच तास हा ब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते दुपारी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत


परिणाम काय? : पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी .49 वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद असतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाऊन ट्रान्स हार्बर लाईन सेवा बंद आहे. सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.


पश्चिम रेल्वे मार्गावर कुठे आणि कसा मेगाब्लॉक?


कुठे? : चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे.


किती वेळ? : सकाळी 10 वाजून 25 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत असा पाच तास मेगाब्लॉक असणार आहे.


परिणाम काय? : जम्बो ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत तसेच ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही सेवा चर्चगेटपासून वांद्रे आणि दादरपर्यंत चालविल्या जाणार आहेत.


मध्य रेल्वे मार्गावर काय बदल असतील?


कुठे? : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर.


किती वेळ? : सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत मध्ये रेल्वेच्या मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे.


परिणाम काय? : सीएसएमटी येथून सकाळी 10 वाजून 14 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 52 मिनिटांपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यामुळे लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील. ठाणे येथून सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 51 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड व माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबतील.