Mumbai Local Train Update: शाहपूर तालुक्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पावसामुळं भारंगी नदीला पूल आला असून या पुराचे पाणी शहरात शिरले आहे. शहापुर येथे निर्माण झालेल्या पुरसदृष्य परिस्थितीमुळं रेल्वे रूळांवरही पाणी साचले आहे. आटगाव, तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडले आहे. त्यामुळं कसाऱ्याकडे येणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहापुरातील पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. मातीचा भराव रेल्वे ट्रॅकवर आल्याने रेल्वे रूळांवर पाणी आणि माती साचली आहे. तर, एकीकडे आटगाव आणि तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडले आहे. वासिंद खडवली येथे OHE पोल एकीकडे झुकला असल्याने कल्याण ते कसारा दरम्यानची रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे. 


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळं OHE पोल वासिंद-खडवली दरम्यान KM 78/3 येथे कलंडला आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण ते कसारा दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कसारा ते सीएसएमटी वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती. 


शहापूरात पूर


शहापूर तालुक्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भारंगी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी शहापूर शहरात शिरला आहे. त्यामुळे शहापूर शहरील अनेक इमारतींमधील पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं असून इमारतींमधील अनेक वाहन पाण्याखाली आले आहेत. तर काही वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. रस्त्याला नदीचे स्वरूप आलं आहे. पहिल्याच पावसात संपूर्ण शहापुर तालुक्यात पूरिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुसळधार पावसामुळं आजूबाजूच्या खेड्यातील काही साकाव ही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत त्यामुळे अनेक आदिवासी वाड्यांचे संपर्क तुटले आहेत. दरम्यान, आसनगांव - माहुली रोडवरील पूल वाहून गेला आहे. महिनाभरापूर्वीच या पुलाचं बांधकाम झालं होतं.