मुंबईः MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आणि मुंबई महानगरपालिका (BMC) मुंबई व उपनगरात उड्डाणपुलांचे जाळे विणत आहे. येत्या काही वर्षांत मुंबईत अनेक उड्डाणपूल उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांचा (Mumbaikars) प्रवास आरामदायक आणि जलद होणार आहे. अलीकडेच MMRDAमे मुंबई महापालिकेला मलाड पश्चिमेकडे 700 मीटर लांब रस्ता आणि 30 मीटर लांबीचा पुला बांधण्यासाठी जागा देऊ केली आहे. त्यामुळं आता पोईसर नदीवर पूल (Poisar Bridge) बांधण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 700 मीटर लांब रस्ता आणि पूल तयार झाल्यानंत जनकल्याण नगर, आयटीआय कॉलेज आणि अथर्व कॉलेजदरम्यानचा रस्ता जोडला जाईल. त्यामुळं मार्वे रोडवरील वाहतूक कोंडीही कमी होईल त्याचबरोबर जुना लिंक रोड आणि नवीन लिंक रोडदेखील जोडले जाणार आहेत. 


कमलेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वळणई मेट्रो स्टेशन ते जन कल्याण नगर, अथर्व कॉलेज, आयटीआय कॉलेज आणि वीर भगत सिंह आतरराष्ट्रीय शाळेत येथे दिवसाला 7 ते 8 हजार विद्यार्थी आणि 4 हजार नागरिक प्रवास करतात. मात्र, इथे येण्यासाठी नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. इथपर्यंत येण्यासाठी नागरिकांना मार्वेरोड हून यावे लागते.त्यासाठी रोज तब्बल 45 मिनिटांचे अंतर पार करावे लागते. मात्र, आता इथे रस्ता आणि पूल बांधून तयार झाल्यानंतर मेट्रो स्टेशनवरुन थेट कॉलेज आणि कल्याग नगर येथपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळं 45 मिनिटांचे अंतर अवघ्या 7 ते 8 मिनिटांत पार पडेल. 


उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी MMRDAच्या आयुक्तांची यासंदर्भात भेट घेतली होती. त्याच्या प्रयत्नांनंतर दोन वर्षांपूर्वी बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर जागेसाठी MMRDAकडे एक प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्तावही पास झाला होता. मेट्रो 2Aच्या मार्गासाठी मालाड, मालवणी कारशेडसाठी MMRDने जागा खरेदी केली होती. मात्र मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर जागा शिल्लक राहिली होती. पोईसर नदीवर जवळपास 30 मीटर लांब आणि 18 मीटर रुंद पूल मुंबई महानगरपालिका बांधणार आहे. या ब्रिजचे काम सुरु करण्यात आले आहे.