Mumbai Metro 3: मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट विशेष भेट मिळणार आहे. मेट्रो 3 पहिल्या टप्प्यात वर्षाच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 2024 मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (MMRC) संचालक अधिकारी अश्वीनी भिडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा एप्रिल 2024 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता भिडे यांनी बोलून दाखवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मेट्रो 3 कुलाबा ते सीप्झपर्यंतचा मार्ग आहे. त्यातील पहिला टप्पा आरे ते बीकेसीपर्यंत असून त्याचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे कारशेडसंबंधित काम पुढील वर्षात जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) सह इतर अधिकाऱ्यांची आवश्यक असलेली मंजुरी मिळवण्यात येईल. 30 नोव्हेंबर पर्यंत आरे-बीकेसी मार्गावर 93.4 टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील सर्व मेट्रो स्थानकांवर एकूण 96.6 टक्के काम आणि भुयारी मार्गावर 98.9 टक्के काम पूर्ण झाले आहे. 


आरे-बीकेसी मार्गावर अवरोधित केलेले 3.8 किमी मार्गावरील 1.2 किमी रस्ता 24 डिसेंबर रोजीच खुला केला होता. मेट्रो 3 च्या कामासाठी बंद करण्यात आलेले 8.5 किमी मार्गामधील बीकेसी-कफ परेड येथील 1.3 किमी मार्ग बंद करण्यात आला आहे. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या 33 किमीच्या संपूर्ण भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती. या मार्गावर एकूण 27 मेट्रो स्थानके आहेत. 


मुंबई मेट्रो 3 हा मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून स्थानकांची उभारणी 98 टक्के पूर्ण झाली असून चार स्थानके जवळपास सज्ज झाले आहेत.


मुंबई मेट्रो पहिल्या टप्प्यातील स्थानके


आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, विमानतळ टर्मिनल २, सहार रोड, देशांतर्गत विमानतळ, सांताक्रूझ, विद्यानगरी व बीकेसी या स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.