Mumbai Metro 3 : मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोच जाळे उभारण्यात येत आहेत. यापैकी केंद्र आणि राज्य सरकारचा बहुचर्चित महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो 3 या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पहिला टप्पा आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे. याचपार्श्वभूमीवर तिकीट विक्री आणि ग्राहक सेवेसाठी एमएमआरसीएलने विशेष संस्थेची नियुक्ती केली आहे. याकरिता मेट्रो प्रशासनाने निविदा देखील मागवल्या आहेत.  आरे ते बीकेसी मार्ग सुरु झाल्यानंतर मुंबईकरांना वाहतुक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मुंबई मेट्रो-3 साठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो-3 मार्ग तयार करण्यात येत आहे. एमएमआरसीएल एप्रिलमध्ये आरे-बीकेसी दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. त्याची तयारी प्रशासनाने जोमाने सुरू केली असून पुढील चार वर्षांसाठी एजन्सी स्थलांतरित तिकीट, सेवा आदी सुविधा देणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.


पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गात एकूण 10 स्थानके असून नऊ भुयारी, तर एक जमिनीवर आहे. तसेच हे अंतर 12.44 किमी आहे आणि दोन गाड्यांमधील कालावधी 6.5 मिनिटे आहे. या मार्गावर पहिल्या टप्प्यात 9 गाड्या धावतील. आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेड या मार्गावर 17 स्थानके असणार आहेत.


वैशिष्ट्ये


एकूण स्थानके 17


अंतर 21.35 किमी


दोन गाड्यांमधील वेळेत 3.2 मिनिटांचा फरक आहे.


दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या 22 आहे


मेट्रो लाईन – 3 स्थानकांची नावे


कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, सांताक्रूझ, CSIA टर्मिनल 1 (देशांतर्गत विमानतळ), सहार रोड, CSIA टर्मिनल 2 (आंतरराष्ट्रीय विमानतळ), मरोळ नाका, MIDC, SEEPZ आणि आरे कॉलनी (ओन्ली – ग्रेड स्टेशनवर)