Mumbai Metro News: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच मुंबईची मेट्रो गतिमान झाली  आहे. मेट्रोच्या कामांना गती आली असून देवेंद्र फडणवीस सरकारकडून मुंबईसह एकूण ७ प्रकल्पांसाठी घसघशीत निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून मेट्रो प्रकल्पांना कर्ज स्वरूपात निधी वितरित केला जाणार आहे. कोणते आहेत हे प्रकल्प जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्रकल्पांसाठी किती निधीची तरतूद केलीये हे जाणून घेऊया. 


- मुंबई मेट्रो २अ, २ बी, आणि ७ प्रकल्पांकरीता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्राप्त कर्जाची रक्कम एमएमआरडीएला वितरीत करण्याबाबत जीआर जारी करण्यात आला असून २७२ कोटी रुपये तिन्ही मेट्रो लाईनसाठी एमएमआरडीएला वितरीत करण्यात येणार आहे. 


- ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो-५ लाईनसाठी राज्य शासनाकडून एमएमआरडीएला २३.८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत


- मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर) आणि मार्ग ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून एमएमआरडीएला २२ कोटी रुपये कर्ज वितरीत 


- मुंबई मेट्रो-७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून २७.५० कोटी रुपये एमएमआरडीएला कर्ज वितरीत


- मुंबई मेट्रो-४ कासारवडवली आणि मेट्रो ४अ कासारवडवली ते गायमुख प्रकल्पासाठी राज्य सरकारचे ५६.८३ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत 


- मुंबई मेट्रो २बी डीएन नगर ते मंडाळे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ५३.९० कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत 


- मुंबई मेट्रो २अ दहिसर पूर्व ते डीएन नगर प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून २७.५० कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत 


- मेट्रो लाईन ६ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी प्रकल्पासाठी ३६.६७ कोटी रुपये एमएमआरडीएला राज्य सरकारकडून वितरीत


वाहतूक पोलिसांकडून महत्त्वपूर्ण परवानग्या मंजूर


मुंबईतील मेट्रो आणि इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मोठा टप्पा ठरलेल्या या निर्णयात, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, आयएएस, यांनी वाहतूक विभागाचे सहआयुक्त अनिल कुंभारे आणि सर्व प्रकल्प अभियंत्यांसोबत विस्तृत बैठक घेतली. या बैठकीत विविध पायाभूत प्रकल्पांसाठी प्रलंबित असलेल्या परवानग्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. या बैठकीत ९ प्रमुख प्रकल्पांसाठी १७ महत्त्वपूर्ण परवानग्या मंजूर करण्यात आल्या, ज्यामध्ये शिवडी-वरळी कनेक्टर आणि महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे.


या परवानग्या मंजूर होणे हा "मुंबई इन मिनिट्स" या प्राधिकरणाच्या ध्येय्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. वाहतूक पोलिसांनी प्रलंबित परवानग्यांच्या मंजुरीसाठी दिलेल्या सहकार्यामुळे या प्रकल्पांना मोठा वेग मिळाला आहे. मंजूर परवानग्यांमध्ये मेट्रो लाइन २बी, मेट्रो लाइन ६, शिवडी-वर्ली कनेक्टर आणि मिसिंग लिंक फ्लायओव्हरसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या वाहतूक परवानग्या आहेत. या परवानग्यांमुळे प्रकल्पांच्या कामात अडथळे येणार नाहीत, तसेच मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बदल गतिमान होतील.