ACB Maharashtra Raid In Mumbai : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Maharashtra ACB ) सोमवारी (6 जानेवारी) औरंगाबादमध्ये मोठी कारवाई केली. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला (arrests government officer) तब्बल 8.5 लाखांची लाच घेतना (taking bribe) रंगे हात अटक करण्यात आली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी आज मुंबईत असाच प्रकार घडला आहे.  मुंबई महापालिका अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 लाख 50 हजारांची लाच घेताना अटक केली आहे (bmc officer arrested while taking bribe). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन राठोड असे या लाचखोर पालिका अधिकाऱ्याचे नाव आहे. राठोड एच पश्चिम विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत होता. लाचखोरी प्रकरणात राठोड याला अटक करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई न करण्याच्या बदल्यात  राठोड याने 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेरीस राठोड  8 लाख 50 हजारांवर तडजोड करण्यास तयार झाला.  अखेरीस  8 लाख 50 हजारांची लाच स्वीकारताना राठोड याला अटक करण्यात आली आहे. 


औरंगाबादमध्ये अधिकाऱ्याला 8.5 लाखांची लाच घेतना रंगे हात अटक


औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात कार्यकरत असलेल्या अधिकाऱ्याला आठ लाख 53 हजार ची लाच घेताना अटक करण्यात आली. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.  देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी  म्हणून कार्यरत आहेत.   तक्रारदार हे चौडेश्वरी कंट्रक्शन परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधा-याचे  दोन ठिकाणी परभणीत काम केले होते  या दोन्ही कामाचे बिल 1 कोटी 19 लाख  आणि 18 लाख असे झाले.  या  दोन्ही कामाचे  बिल काढण्यासाठी   विभागाचे व्यवस्थापकीय संचालक  सुनील कुशिरे  यांच्यासाठी 7.5  टक्के प्रमाणे 8 लाख 3 हजार 250  रुपये,  आणि स्वतःसाठी आणि महामंडळ कार्यालयाचे मिळून 50 हजार  रुपये असे एकूण 8 लाख 53 हजार 250 रुपये लाचेची मागणी केली होती. या नुसार   महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरगाबाद कार्यालयासमोर  सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली. 


मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार


मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी एसीबीच्या रडारवर असल्याची माहिती उघड झाली होती. यानंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 55 कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद झालेल्या 53 अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या 134 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.