कौआ बिर्यानीनंतर कबूतर स्टाटर्स... मुंबईतल्या `या` भागातल्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार
Mumbai News: आपल्याला अनेकदा घरी नॉनव्हेज खायला जमत नाही किंवा मिळत नाही म्हणून आपण उपाहरगृहांमध्ये जेवायला जातो. नॉनव्हेज म्हणून आपण अनेकदा चिकन आवडीनं खातो परंतु मुंबई एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई: आपल्याला अनेकदा घरी नॉनव्हेज खायला जमत नाही किंवा मिळत नाही म्हणून आपण उपाहरगृहांमध्ये (non veg food) जेवायला जातो. नॉनव्हेज म्हणून आपण अनेकदा चिकन आवडीनं खातो परंतु मुंबई एक धक्कादायक प्रकार (shocking news in mumbai) समोर आला आहे. सायन येथील उपाहरगृहात कोबंडी वडे म्हणून चिकनचं मासं नाही तर पाळीव कबूतराचं मासं खायला वाढलं. अशा प्रकारानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. उपहार गृहात गेल्यावर कोंबडी वड्या पासून वेगवेगळ्या डिशची ओर्डर दिली (chicken) जाते मात्र ती कोंबडीच असते का याबाबत आता शंका निर्माण झाली आहे . निवृत्त लक्षर अधिकारी कॅप्टन हरेश हुंदराज गगलानी यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायन (sion news) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (mumbai news a hotel serves pigeons inspite of chicken shocking news)
कबुतर तंदुरी, कबुतर क्रिस्पी (pigeon instead of chicken) ही नावे ऐकून चक्रावून गेलात ना? कारण जेव्हा तुम्ही चिकनची ऑर्डर करताना तुमच्या ताटात पीजन येऊ शकेल म्हणजेच कोंबडीच्या ऐवजी कबुतर. सायन येथील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पोलिसांना माहिती दिली की एका उपहार गृहात कबुतराचे मास खाण्यासाठी दिले जाते. यावर मुंबई पोलिसांनी निवृत्त लष्कर अधिकारी कॅप्टन हरेश गगलानी यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन हरेश हुंदराज गगलानी हे सायन येथे राहतात आणि त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर कबुतर पाळले जात असून त्याचा वापर हा उपहार गृहात खाद्य पदार्थ म्हणून विकला जातो अशी माहिती प्राप्त झाली. तक्रारदार यांनी उपहारगृहात काम करणाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन विचारले असता या कबुतरांचे काय करता यावर त्यांना धक्कादायक बाब समोर आली की ही कबुतराचे मास (pigeon meat) उपहार गृहात खाद्य म्हणून विकले जाते. यावर त्यांनी पोलिसात तक्रार केली. यावर पोलिसांनी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोंबडी खाताय की कबुतर?
उपहारगृहात गेल्यावर कोंबडी वडे पासून वेगवेगळ्या डिशची (dish) ओर्डर (order) दिली जाते मात्र ती कोंबडीच असते का याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. निवृत्त लक्षर अधिकारी कॅप्टन हरेश हुंदराज गगलानी यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यात (crime news today) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कॅप्टन हरेश हुंदराज गगलानी यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर कबुतर पाळले जातात आणि त्याचा वापर हा उपहार गृहात खाद्य म्हणून केला जातो. निवृत्त लक्षर अधिकारी हे सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर मागील काही महिन्या पासून कबुतरे (pet pigaon) पाळली जात होती तर टेरेसला टाळे लावले असल्याने ते आत जाऊ शकत नव्हते यावर त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने टेरेस उघडले असता त्या ठिकाणी कबुतरे पाळली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
अधिकारी यांनी उपहारगृहात (hotel workers) काम करणाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन विचारले असता या कबुतरांचे काय करता यावर त्यांना धक्कादायक बाब समोर आली की ही कबुतराचे मास उपहार गृहात खाद्य म्हणून विकले जाते. यावर त्यांनी पोलिसात तक्रार केली. यावर मुंबईच्या सायन (sion) पोलिसांनी 8 जणांच्या विरोधात कलम 34, 427 आणि 428 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. झी 24 तास ने पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेतली असता सायन पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. जर तथ्य आढळल्यास त्या आठ जणांवर अटकेची कारवाई होऊ शकते. तर या तक्रारीत किती तथ्य आहे याचा ही तपास पोलीस करत आहेत.