अभिनेत्रीचे मॉर्फ्ड न्यूड फोटो तिच्याच नातेवाईकांना पाठवले, 34 वर्षांच्या कंप्यूटर इंजीनियरला अटक
Mumbai Crime News Today: सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मॉर्फ्ड केलेले न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Mumbai Crime News: काही महिन्यांपूर्वी एका अभिनेत्रीचे मॉर्फ्ड न्यूड फोटो तिच्याच नातवाईकांना पाठवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. वर्सोवा पोलिसांनी 34 वर्षांच्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी सातत्याने त्याचे लोकेशन बदलत होता. तो कधी बेंगळुरू मध्ये तर, कधी धाराशिव तर कधी पुण्यात असे लोकेशन ट्रेस होत होते. अखेर पोलिसांना सापळा रचत या आरोपीला धाराशिव येथून ताब्यात घेतलं आहे. आरोपी कंम्युटर इंजिनिअर असून पुण्यातून तो एमबीए करत होता. (Mumbai Crime News Today)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीत त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि त्याच्या मोबाइल नंबर सातत्याने ट्रॅक करत होते. अखेर मंगळवारी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी हा धाराशिवमध्ये असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. तो मुळचा पुण्याचा रहिवाशी होता. पोलिसांना माहिती मिळताच ते लगेचच त्याच्या शोधासाठी धाराशिव येथे पोहोचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
फोटोंबाबत मित्राकडून कळले
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि अभिनेत्री हे कधीच भेटले नव्हते. तिच्यासोबत चॅटिंग करण्यासाठी तो सातत्याने मागे लागला होता. अभिनेत्री गेल्या दोन वर्षांपासून अंधेरीत तिच्या मैत्रिणीसह राहते. मागच्याच महिन्यात तिला एका मित्राचा मेसेज आला की, सोशल मीडियावर तिचे मॉर्फ्ड न्यूड फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर अभिनेत्रीला कळले की तिच्या जवळच्या नातेवाईकांना व मित्रांनाही हे फोटो पाठवण्यात आले आहे. फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्याची धमकीदेखील दिली होती. त्यानंतर अभिनेत्रीने या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीचे फेक अकाउंट
डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष टीम गठित करण्यात आली होती. या टीमने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. जिथून सगळ्यात पहिले हे फोटो शेअर करण्यात आले होते. त्या अकाउंटची चौकशी पोलिसांनी सुरु केली होती. पोलिस तपासात समोर आले की हे अकाउंट फेक ऐहे. मात्र, पोलिसांनी सायबर विभागाकडून इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता मागवला आणि त्यावरुन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.