Mumbai Crime News Today: मुंबईतील अंधेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच आरोपी पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पोलिसांनी खोटी कहाणी रचून सांगितली. मात्र कोर्टासमोर सत्य उघड होताच पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी गंभीररित्या होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच चौकशी करण्यासाठी पोलिस रुग्णालयात गेले. तेव्हा त्यांनी महिलेचा जबाब नोंदवला. मात्र, जबाब देताना महिलेने अपघाताने घरात आग लागल्याचे आणि ती त्यात अडकल्याचे सांगतले. पत्नीच्या जबाबामुळं पतीवर कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाही. 


महिला या घटनेत गंभीररित्या होरपळली आहे तिच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुड्डी परमार असं महिलेचे नाव असून 23 वर्षांची आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय राजीव परमान यांनी स्वतःवरील अपराध मिटवण्यासाठी चुकून स्टोव्हचा स्फोट झाला आणि त्यात पत्नी गंभीररित्या भाजली असल्यचा दावा केला. तसंच, पत्नीला वाचवण्याच्या प्रय़त्नात त्याचे ही हात जळले होते, असंही त्याने पोलिसांना सांगितले. सात नोव्हेंबर रोजी तिला रुग्णालयात दाखल केले होते. 


पोलिसांना सुरुवातीला दिलेल्या जबाबातही महिलेने घरात जेवण बनवत असताना स्टोव्हचा स्फोट झाला आणि त्यात ती होरपळली, असं म्हटलं होतं. मात्र, रुग्णालयात न्यायदंडाधिकारी समोर जबाब देताना मात्र तिने पतीवरच गंभीर आरोप केले. पतीनेच तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने म्हटलं आहे. महिलेने जबाब पलटल्यानंतर पोलिसही हैराण झाले आहेत. 


महिलेने न्यायदंडाधिकारी यांना दिलेल्या जबाबानुसार, तिचा पती व्यसनी होता नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीवरुन तो तिला मारहाण करत असे. यावरुन महिला त्याची पोलिसात तक्रार करणार होती. म्हणून त्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तिला ठार करण्यासाठी आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावली. मात्र, तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेजारी धावत आले. त्यामुळं कोणाला संशय येऊ नये म्हणून आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तसंच, तिला पोलिसांना खर न सांगण्याची धमकी दिली. 


महिलेने सुरुवातीला पोलिसांना सत्य सांगणे टाळले मात्र नंतर तिने आपल्या पतीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गंत (हत्येचा प्रयत्न करणे) घरगुती हिंसाचार, धमकी देणे हे आरोप दाखल करुन त्याला अटक केली आहे.