गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई: फिर हेरा फेरी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेलच. तुम्ही आणि आम्ही हा चित्रपट निदान शंभर वेळा पाहिला असेल आणि तो आपला पाठही झाला असेल. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना कुठे घडल्या तर आपण नक्कीच त्या ओळखू शकतो. तेव्हा असाच एक प्रकार कुरार येथे घडला आहे. कुरार पोलीस स्टेशनमध्ये घरामध्ये खोदकाम करताना गुप्त धन सापडले आहे, त्यातील सोने स्वस्तात विकायचे आहे अशी बतावणी करून नकली सोने दाखवून लोकाकडून 4 लाख 60 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार तपास करून मंछाराम नाथुराम परमार, जगदिश उर्फ जगाराम दयाराम साखला या दोघांना अटक केली आहे. त्याच्याकडून 2 मोबाईल फोन जप्त केले तसेच यांनी आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे.याचा तपास केला जात आहे. (mumbai news police captured two men for fraudly cheating and robbing money)


पाहा कशी चोरी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुरार इथल्या एका दुकानात  दुपारच्या वेळी दोन इसम गेले.  त्यांनी त्या दुकानादाराशी गप्पा मारायला सुरूवात केली आणि त्यांना सांगितले की ते मजूरीचं काम करतात आणि अशाप्रकारे एकदा खोदकाम करताना त्यांना सोनं सापडलं आहे आणि ते त्यांना विकायचं आहे. हे गुप्तधन आहे असा दावा त्यांनी केला होता. तेव्हा त्यांनी विचारले की त्यांना हे सोनं खरं आहे की नाही याची तपासणी करायची होती तेव्हा ही तपासणी केली असता समोर आलेल्या माहितीनूसार त्यांना मिळालेलं सोनं खरं असल्याची खात्री पटली. तेव्हा गुन्हेगारांनी सांगितले की हे 10 लाखांचे गुप्तधन आम्ही तुम्हाला 5 लाखांना विकू. 


मग या दुकानदारानं आपल्या मित्रांकडून आणि काही पैसे गोळा केले आणि त्यातून त्यानं 4 लाख 60 हजाराची रक्कम गोळा केली आणि अशाप्रकारे तो दुकानदार त्यांच्याकडे पैसे घेण्यासाठी गेला आणि त्याच्याकडून त्या गुन्हेगारांनी पैसे उकळले आणि त्याला ते सोनं दिले परंतु हे खोटे सोने होते याचा त्या बिचाऱ्याला पत्ताच नव्हता. शेवटी ते सोनं खोटं असल्याचं तपासणीत उघड झाले. तेव्हा त्या दुकानदाराला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आलं आणि त्यानं त्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिसांनी चोरट्यांना पकडेलच 


पोलिसांनी या बाबत गुन्हेगारांचा तपास करायला सुरूवात केली आहे. या गुन्हेगारांचा बरेच दिवस तापस चालू होता. हे यापुर्वी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यांची कबूलीही दिली आहे आणि असे आणखी काही गुन्हे केले असल्याचीही त्यांनी कबूली दिली आहे.