Two Vehicles With Same Number Plate: एकाच चेहऱ्याच्या दोन व्यक्तींची कथा आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र, एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी कुलाब्यात घडला आहे. कुलाबा परिसरातील ताज हॉटेल परिसरात समान क्रमांकाच्या समान कंपनीच्या दोन गाड्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गाडया पोलीस ठाण्यात आणून याचा तपास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. समान क्रमांकाच्या समान कंपनीच्या दोन गाड्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गाडया पोलीस ठाण्यात आणून याचा तपास केला आहे. यात बनावट नंबर प्लेट बनवून एकप्रकारे फसवणूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात गाडीचे मूळ मालक असलेल्या साकीर अली यांनी तक्रार दिली असून याबाबत आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 


साकीर अली यांनी काय सांगितलं


साकीर आली यांनी या प्रकरणावर सविस्तर माहिती दिली आहे. मी नरीमन पॉईंट येथे कार चालवत होतो. मात्र गेल्या आठ महिन्यापासून माझ्याच नंबर असलेली सेम  गाडी रस्त्यावर चालत असल्याचे मला समजले. त्याचे सर्व फाईन मला येत होते. एक दोन तीन वेळेला मी ते फाईन भरले पण सातत्याने असे व्हायला लागल्यानंतर मी आरटीओ मध्ये देखील तक्रार केली होती मात्र आरटीओने यावर कोणतेही प्रकारे कारवाई केली नाही, असं ते म्हणाले.


आज मी एका प्रवाशांना ताज हॉटेल येथे सोडण्यात आलो असताना माझ्या शेजारी माझ्याच नंबरची माझ्याच मॉडेलची असलेली एक गाडी मला दिसली. त्यानंतर मी त्या गाडीची चौकशी करण्यासाठी त्याच्याजवळ गेलो असता चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूचे टॅक्सी चालक आणि पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती साकीर अली यांनी दिली.


आरोपीचे कारचे हफ्ते थकल्यामुळं त्याने गाडीचा नंबर बदलला असल्याचे पोलिस चौकशीत सांगितले. त्याचा कारचा नंबर MH 01 EE 2383 असा आहे. मात्र मात्र कर्जाचे  हप्ते थकल्यामुळे MH 01 EE 2388 असा नंबर बदलून घेतल्याचे तो सांगत आहे.