COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : घाटकोपर बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉण्टेड आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. इरफान अहमद गुलाम अहमद कुरेशीला असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेले १६ वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रगटीकरण युनिट दहाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी औरंगाबादेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली होती.


दरम्यान, रविवारी सायंकाळी अटक करून विशेष वाहनाने आरोपीला मुंबईत नेण्यात आले. मुंबईतील घाटकोपर येथे २००२ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात आतापर्यत १९ जणांना अटक झाली आहे. तर, ९ आरोपी अद्याप फरार आहेत.