पुणे : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर उद्या म्हणजे गुरुवारी ६ सप्टेंबरला तुम्ही मुंबई ते पुणे  किंवा पुणे - मुंबई असा प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण हा एक्स्प्रेस वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात येणार आहे. तर अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावर खालापूर टोल नाक्‍याच्या अगोदर ओव्हरहेड गॅण्ट्री बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे. 


हे काम सुरू असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या छोट्या वाहनांना शेडूग फाटामार्गे जुन्या मुंबई-पुणे मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येणार आहे. दरम्यान, या कालावधीत महामार्गावरुन होणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. अवजड वाहने मागेच थांबवण्यात येणार आहेत.