दीपक भातुसे, मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील टोल 1 एप्रिलपासून वाढणार आहे. टोल दरात 18 टक्के वाढ होणार आहे. लहान वाहनांच्या टोलमध्ये 40 रुपयांची वाढ होणार आहे. आधी 230 रुपये द्यावे लागत होते आता 270 रुपये द्यावे लागणार आहे. कारसाठी सध्याचा टोल 230 रुपये होता. तो ही  1 एप्रिलपासून 270 रुपये होणार आहे. मिनीबससाठी सध्या 355 रुपये मोजावे लागत होते. पण आता 420 रुपये टोल द्यावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बससाठी सध्या 675 रुपये टोल आकारला जात होता. पण आता बसला 797 रुपये टोल द्यावा लागणार आहे. ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या 493 रुपये मोजावे लागत होते. पण 1 एप्रिलपासून 580 रुपये टोल बसला भरावा लागणार आहे.


क्रेन आणि अवजड वाहने तसेच टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना आता 1555 रुपये टोल द्यावा लागत होता. पण आता नवीन वाढीनुसार त्यांना 1835 रुपये टोल भरावा लागणार आहे.


महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने टोल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला यामुळे कात्री लागणार आहे. याआधी 2017 मध्ये देखील टोलचे दर वाढवण्यात आले होते. 


मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आणखी 15 वर्ष टोल आकारला जाणार आहे. तीन वर्षांनी एक्स्प्रेस-वेवरील टोलच्या दरात 18 टक्क्याने वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती.