Toll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ
Mumbai Pune News : दर दिवशी मुंबई- पुणे असा प्रवास असंख्य वाहनधारक करतात. पण, त्यांच्या खिशाला येत्या काळात फटका बसणार आहे. कारण टोलचे दर वाढले आहेत. पाहा महतत्वाची बातमी.
Mumbai Pune News : नव्या आर्थिक वर्षात नागरिकांच्या खिशाला अनेक मार्गांनी चटका बसू शकतो. त्यातलाच एक मार्ग ठरणार आहे रस्ते प्रवासादरम्यान येणारा टोल. वाहनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची, कारण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोलचे दर पुन्हा वाढणार आहेत. 1 एप्रिलपासून टोल दरांत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. Mumbai - Pune असा प्रवास करणाऱ्यांना जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. (Mumbai Pune express way Toll tax will increase by 18 percent know the new rates)
नव्या दरांनुसार कारचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये होणार आहे. तर, बससाठी टोलचा 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी इथं सध्या 580 रुपये द्यावे लागत होते. यापुढे 685 रुपये द्यावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.
1 एप्रिलपासून टोल दरवाढ
1 एप्रिलपासून देशात टोल टॅक्सच्या दरात वाढ केली जाणार आहे. ज्यामुळं रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकटच उभं राहणार आहे. देशातील काही राज्यांमध्ये ही टोल दरवाढ लागू असेल. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra weather : महबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी, वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठले
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून ही टोल दरवाढ करण्यात येणार असून, याचे थेट परिणाम राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गानं प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना भोगावे लागणार आहेत. या मार्गांवर सरासरी 5 ते 10 टक्के टोलवाढ केली जाऊ शकते.
नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून टोलसाठीची नवी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळं ही दरवाढ अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली, मुंबई एक्स्प्रेस वेसाठीसुद्धा वाहनांना जास्तीचा टोल भरावा लागू शकतो.