खालापूर : लाँग विकेंड आणि ख्रिसमची लगबग यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग तीन सुट्ट्यांमुळे पर्यटक पुणे, लोणावळा, खंडाळा या ठिकाणी पर्यटक फिरायला येत असल्यानं, सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेवरवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच खंडाळा बोर घाटामध्ये २ ठिकाणी अपघात झाला. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. 


सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाहीये. अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी या तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 


काही वाहने दस्तुरी इथून नो एंन्ट्रीतुन लोणावळ्याला जात होती. याचा त्रास लोणावळ्यावरुन येणाऱ्या वाहनांना होत होता. एक्सप्रेस-वेसह पाली, खोपोली, पेण, खोपोली या राज्य मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.


तिकडे मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी दिसून येतेय. पेण ते खारपाडा दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्यात. सलग सुटयांमुळे पर्यटक कोकणाकडे येतात. मात्र, कोंडीमुळे पर्यटकांचे हाल होतायत. शिवाय बेशिस्त वाहनचालकांचा फटकाही नागरिकांना बसतोय.



मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी