Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरील वाहतुक बंद राहणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं अवाहन महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना केले आहे. (Mumbai-Pune Expressway News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येत आहेत. मात्र, आता प्रशासनाने खोपोली एक्‍झीट पासून मुंबईकडे येणारा मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवला आहे. हा मार्ग बंद ठेवण्यात असल्यामुळं खोपीली एक्झिटजवळच तीन पदरी पर्यायी मार्गाचा वापर मुंबईला जाण्यासाठी वापरावा, असं अवाहन करण्यात येत आहे 


पुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्‍झीटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे. मुंबईला जाण्‍यासाठी पर्यायी मार्ग म्‍हणून खोपोली एक्‍झीटजवळ नवीन तीनपदरी मार्ग तयार करण्‍यात आला असून तो आजपासून वाहतूकीसाठी खुला करण्‍यात आला आहे.


मुंबईकडे जाणारया प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येईल. मुंबईला जाणारया प्रवाशांनी खोपोली एक्‍झीट पूर्वी साइन बोर्ड बघून डाव्‍या बाजूने प्रवास करावा असे महामार्ग पोलीसांकडून आवाहन करण्‍यात आले आहे. दरम्यान, वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.


शक्तीपीठ महामार्गाला विरोध


नागपूर ते गोवा या नव्या 800 किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी सध्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.  मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला आता विरोध वाढू लागला आहे. प्रस्तावित या महामार्गात जमिनी जाणाऱ्या कागल तालुक्यातील शेतकरी आता एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आपला लढा सुरू केला. या शेतकऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देत महामार्गासाठी सुरू असणारा सर्वे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.  या नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नव्या महामार्गाची गरज काय? असा सवाल या संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


कशेडी बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू


मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते. कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.