अलिबाग, रायगड : Mumbai-Pune Expressway traffic jam : विकएंड आणि ख्रिसमसची सुट्टी असल्याने लोक घराबाहेर पडले आहेत. त्यातच राज्यात पडलेली मस्त थंडी. यामुळे अनेक जण फिरण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहे. आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway ) मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाताळ आणि सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडल्याने राज्यात थंडी चाहुल वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. दरम्यान, एक्स्प्रेस वेवर 28 डिसेंबरला दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.



बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. आडोशी बोगदा ते खंडाळापर्यंत वाहनांचा वेग मंदावला आहेत. नाताळ आणि सुटयांमुळे पर्यटक बाहेर पडल्याने वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे जाम झाल्याचा दिसून येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी दिसून येत होती.


अमृतांजन पुलापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग आहे. दरम्यान,शुक्रवार सायंकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची मोठी रांग असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावरही काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. नाताळाच्या सुट्ट्या असल्याने लोक गोव्याला तसेच गावी जायला  निघाले आहेत.