Mumbai Pune Expressway traffic News : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.  खालापूर टोल नाका ते बोरघाट दरम्यान ही वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दिवाळी निमित्त अनेक लोकं आपल्या गावी निघाले आहेत. तसेच पुण्याच्या दिशेने जाणारे लोक कोंडीमुळे रस्त्यात अडकलेत. वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी दिसून येत असल्यामुळे पुणे - मुंबई मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीची सुट्टी पडली. त्यातच आज चौथा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई -पुणे (Mumbai Pune Express News) द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोल नाका व बोरघाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ( traffic jam on Mumbai Pune Expressway for the second day)


 मुंबईकडून पुण्याकडे जाताना खालापूर टोलनाक्यावर दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर सलग दुसऱ्या दिवशी बोरघाटात अमृतानजन पुलाजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई - पुणे वाहतूक मंदावली आहे. पुण्याच्या दिशेने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई - पुणे  मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातच अवजड वाहनांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.


कालही मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीबाबत माहिती घेऊन बाहेर पडा. अन्यथा रस्त्याच अडकून पडण्याची शक्यता आहे. काल बोरघाट अमृतांजन ब्रीज ते दत्तमंदिरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. बोरघाट टॅबचे महामार्ग वाहतूक पोलीस रस्त्यावरी कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करत होते. आजही वाहतूक  पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.