पुणे : पुणे शहरात काल दिवसभर पावसानं उघडीप दिली होती. मात्र रात्री सर्वत्र जोरदार पाऊस झाला. रात्री उशीरा सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे शहरातील येरवडा, शांतीनगर, बी टी कवडे रोड, वानवडी आझादनगर, पद्मावती, मार्केट यार्ड अशा काही भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हानी खूप मोठ्या प्रमाणावर नसली तरी याआधीच्या अनुभवामुळे पुणेकरांनी रात्र अक्षरशः जागून काढली. पुण्यातील कात्रज तलाव पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाला असून त्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ओढ्याला पूर आला होता. 


कात्रज नवीन वसाहती जवळ पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे. तर मुंबईतही काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसानं रात्री मुंबईसह उपनगरांत पुन्हा हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या हा पाऊस पडतोय.