Raigad : आताची मोठी बातमी समोर आली आहे. रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्याार्थ्यांचा (Students) बुडून मृत्यू झाला. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे (Rizvi College) विद्यार्थी होते. खालापूर (Khalapur) तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे. इथल्या सत्य साई बाबा बंधाऱ्याजवळ 37 विद्यार्थी-विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते. यातल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी मृत युवकांची नावे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप रायगडमध्ये पावसाळी सहलीसाठी आला होता. 37 जणांच्या या ग्रुपमध्ये 17 मुली होत्या. सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रेकिंगसाठी आले होते. तिथून परतत असताना धावडी नदीच्या बंधाऱ्यावरील सांडव्याखाली डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी हे सर्व विद्यार्थी तिथे थांबले. पण बंधाऱ्यावरील पाण्याच अंदाज न आल्याने चार विद्यार्थी बुडाले. चार ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. 


खालापूर तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी  होते.