Mumbai South Central Lok Sabha Election Results 2024 Live Updates: लोकसभा निवडणूक 2024 चा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघातून शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघातही दोन शिवसैनिंकामधील कडवट लढत पाहायला मिळाली. अखेर या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचा विजय झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकांचा निकाल काहीच तासांत स्पष्ट होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष हे महाराष्ट्र व मुंबईकडे लागून राहिले होते. मुंबईतील सहा मतदारसंघात कोण सत्ता राखणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे व ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होते. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला होता. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अनिल देसाई 36 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 


दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांनी 36 हजार मतांची आघाडी घेतली आहे. 2019मध्ये याच मतदारसंघातून राहुल शेवाळे यांनी निवडणूक लढवली होती आणि ते विजयी देखील झाले होते. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना लोकसभेचे तिकिट दिले होते.