मुंबई: आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सह्याद्रीवर झालेली बैठक सकारात्मक झाली आहे. शिष्टमंडळ, परिवहन मंत्री यांच्यासोबत झालेली बैठक सकारात्मक झाली आहे. अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी देखील प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिले. सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती गोपिचंद पडळकर यांनी दिली आहे. 


10 वर्षांत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली जाणार आहे. बेसिक वेतन साडेबारा हजार रुपयांवरून साडे अठराहजार रुपये होण्याची शक्यता आहे. 



सह्याद्रीवरील बैठकीत काय ठरले ?

१. एसटी कामगारांच्या बेसिक पगारामध्ये पाच ते सात हजारांची वाढ करण्यासाठी सरकार सकारात्मक

२. प्रत्येत महिन्याच्या ७ तारखेला होणार वेळेत पगार

३. आंदोलनामध्ये आणि संपामध्ये सहभागी झालेल्या ज्या-ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि सेवा समाप्ती ची कारवाई मागे घेण्यात येईल


काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन 50 हजारांच्या वर आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कमी दिली जाणार आहे. आजच्या संपाबाबतची बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 


या सकारात्मक बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले याबाबत थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सगळ्याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलं आहे.