ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग `या` महिन्यात होणार पूर्ण
Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे.
Samruddhi Mahamarg completion date: राज्यातील सर्वात हायटेक आणि बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पुढच्या आणि अंतिम टप्प्या सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गातील चौथ्या टप्पा इगतपुरी ते ठाणे दरम्यान 76 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यात 16 पूल आणि 4 बोगदे बांधण्याच येत असून हे काम 95 टक्क्यांहून अधिक पूर्ण झालंय. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे. हा हायटेक समृद्धी महामार्ग ऑगस्ट-सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु होणार आहे. (Mumbai to Nagpur 7 hours Nashik to Shirdi 5 hours Samriddhi Highway will be completed in August)
अंतिम टप्प्यातील कामाला गती!
खर्डीजवळ पुलाच काम सुरू असून हा पूल सुमारे 82 मीटर म्हणजेच 27 मजली इमारतीइतका उंची आहे. या महामार्गावरील पुलाचे कामही 97 टक्के पूर्ण झालाय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने इगतपुरी ते मुंबईदरम्यान डोंगरातून बोगदा बांधण्याचं काम गतीने सुरु आहे. मात्र, दोन डोंगरांमधील उंच पूल बांधण्यासाठी बराच वेळ लागत आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 701 कि.मी. लांबीचा समृद्धी हा मार्ग पूर्णत्वाला जाणार आहे. यापूर्वी महामार्गावरील 625 कि.मी. चा मार्ग वाहनांसाठी खुला झालाय.
11 डिसेंबर 2022 ला समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमी. महामार्ग प्रवेशासाठी खुला झालाय. दुसऱ्या टप्प्यांतर्गत शिर्डी ते भरवीर दरम्यान 80 कि.मी. आणि तिसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी दरम्यान 25 कि.मी. हा मार्गवर वाहतूक सुरु झाला.
आता अंतिम टप्पा मुंबई ते नागपूर प्रवास 7 तासांवर
ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये हा महामार्ग सुरु झाल्यानंतर मुंबई ते नागपूर अवघ्या 7 ते 8 तासांत गाठू शकणार आहोत. मुंबई-नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबतच मुंबईहून नाशिक आणि शिर्डीही आता जवळ येणार आहे. तासांतास प्रवासात जाणारा वेळ समृद्ध महामार्गामुळे जवळ येणार आहे. मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी लोकांना 7 ते 8 तास लागतो. पण आता समृद्धीमुळे हा प्रवास 5 तासांवर आला आहे. त्याशिवाय महामार्ग मुंबईच्या जवळ आणण्यासाठी भिवंडी ते ठाणे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचेही रुंदीकरण युद्धपातळीवर सुरु आहे.
पावसाळ्यानंतर महामार्गाचे विस्तारीकरण
ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये हा महामार्गाचा अंतिम टप्पा पूर्ण होणार असून पावसाळ्यानंतर राज्यातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम करण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर ते गोंदिया आणि गडचिरोलीदेखील जवळ येणार आहे. या विस्तारासाठी अनेक कंपन्यांनी आर्थिक निविदा पाठवल्या आहेत. येत्या काही दिवसांत निविदा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार असून पावसाळ्यानंतर हे काम सुरु होणार आहे.