Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 मे ते 2 जूनदरम्यान मुंबई-पुणे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ही घोषणा केली आहे. प्री-नॉन इंटरलॉकिंग काम सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून तसे निवेदन जारी करण्यात आले आहेत. तसंच, प्रवाशांनी या कामात सहकार्य करावं, असं अवाहनदेखील मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळं लांब गाड्यांना जोडण्यास मदत होणार आहे. त्यामुळं सीएसएमटीमधील ट्रेन ऑपरेशनची कार्यक्षमता सुधारणार आहे. त्यामुळं 28 मे ते 2 जूनदरम्यान मुंबई-पुणे दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना थोडाी गैरसोय सोसावी लागणार आहे. 


रद्द झालेल्या गाड्यांची यादी


२८ मे २०२४


गाडी क्रमांक १२१२६: पुणे-मुंबई प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२५: मुंबई-पुणे प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


२९ मे २०२४


गाडी क्रमांक १२१२६: पुणे-मुंबई प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२५: मुंबई-पुणे प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


३० मे २०२४


गाडी क्रमांक १२१२६: पुणे-मुंबई प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२५: मुंबई-पुणे प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


३१ मे २०२४


गाडी क्रमांक १२१२६: पुणे-मुंबई प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२५: मुंबई-पुणे प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२८: पुणे-मुंबई इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस


१ जून २०२४


गाडी क्रमांक १२१२८: पुणे-मुंबई इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२७: पुणे-मुंबई इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक १२१२३: मुंबई-पुणे डेक्कन कीन सुपरफास्ट एक्सप्रेस


गाडी क्रमांक १२१२४: पुणे-मुंबई डेक्कन कीन सुपरफास्ट एक्स्प्रेस


गाडी क्रमांक ११००८: पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११००७: मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११०१०: पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११००९: मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस


२ जून २०२४


गाडी क्रमांक १२१२६: पुणे-मुंबई प्रगति सुपरफास्ट एक्सप्रेस


गाडी क्रमांक १२१२५: मुंबई पुणे प्रगति सुपरफास्ट एक्सप्रेस


गाडी क्रमांक १२१२७: पुणे-मुंबई इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस


गाडी क्रमांक १२१२३: मुंबई-पुणे डेक्कन क्कीन सुपरफास्ट एक्सप्रेस


गाडी क्रमांक १२१२४: पुणे-मुंबई डेक्कन कीन सुपरफास्ट एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११००८: पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११००७: मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११०१०: पुणे-मुंबई सिंहगढ़ एक्सप्रेस


गाडी क्रमांक ११००९: मुंबई-पुणे सिंहगढ़ एक्सप्रेस