Mumbai University Exam postponed: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतरच परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठाने सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार होत्या. आता त्या पुढे ढकलण्यात आल्या असून दिवाळीनंतरच या परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.  दरम्यान, हे सत्र उशीरा सुरु झाल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाने हा निर्णय घेतल आहे.


मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात आला. 2022 च्या हिवाळी सत्राच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांच्या नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा , मानव्य विद्याशाखा , विज्ञान तसेच तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा अधिक परीक्षा होणार आहेत.


या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले  की, 2022 च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.