Mumbai University Senate Election 2024 :  मुंबई विद्यापाठीची सिनेट निवडणूक अखेर होणार आहे.. राज्य सरकारने दिलेली स्थगिती मुंबई हायकोर्टाने उठवली. मुंबई विद्यापीठाच्या विनंतीवरून उद्या होणारी निवडणूक 24 सप्टेंबरला होणाराय... मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाने विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळाला असून निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी राज्य सरकारने सिनेट निवडणुकीला स्थगिती दिली... आणि त्यावरुन मग राजकारणही तापलं.. आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलनसुद्धा केलं.. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित केल्यानं अभाविपनं आक्रमक पवित्रा घेत मुंबईत जोरदार आंदोलन केलं. निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या दबावानं विद्यापीठ प्रशासनानं रद्द केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.. राजाबाई टॉवर वर्षा बंगल्यापुढे झुकल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय... यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी  जोरदार घोषणाबाजी केलीय.. मात्र आता मुंबई हायकोर्टाने निवडणुकीची  स्थगिती उठवल्याने उद्याच सिनेट निवडणुका पार पडणार आहेत..


एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवतात, पण मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. सरकार घाबरल्यानं सिनेट निवडणूक रद्द केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.. कुलगुरुंची चौकशी करण्याची मागणी ठाकरेंनी केलीय.. तर संजय राऊतांनीही कुलगुरुंवर निशाणा साधलाय.. सिनेटची निवडणूक स्थगित केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंनीही टीका केली होती.सिनेट निवडणूक स्थगित केल्यावरून मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न पडला आहे.. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून काम करणं अपेक्षित आहे. परंतू, त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे.


मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, अशी अपेक्षा आहे.. पदवीधरांच्या बाबतीतलं सरकारचं षडयंत्र न्यायालयानं हाणून पाडल्याची प्रतिक्रिया युवासेनेचे नेते वरुण सरदेसाईंनी दिलीय. मुंबई विद्यापीठातल्या दहा जागांसाठी आता 24 सप्टेंबरला निवडणूक होणाराय .. यामध्ये ठाकरेंची युवासेना आणि अभाविपमध्ये प्रमुख लढत होणार आहे... तर वंचित बहुजन आघाडी आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनांचे उमेदवारही रिंगणात उतरले आहेत.. त्यामुळे 24 सप्टेंबरला होणारी निवडणूक रंगतदार होणार असून 27 सप्टेंबरला लागणा-या निकालात कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..