Weather Update: राज्यासह (Maharastra) मुंबईत गुलाबी थंडीचं राज्य सुरु झालंय. मुंबईचं (Mumbai News) महाबळेश्वर झालंय. भर दुपारी गारेगार वारे वाहत आहेत. अख्खा दिवस हुडहुडीत (Winter) जातोय. मुंबईत काल यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलीय. मुंबईचा पारा 13.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. कमाल तापमानातही (maximum temp) घसरण झाल्यामुळे मुंबईत दिवसभर गारठा जाणवत होता. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे (cold wave) तापमानात घट झालीय. आणखी 3 दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असणार आहे. दरम्यान मुंबई आणि राज्यात थंडी का वाढलीय?, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. (Mumbai Weather Update Pink winter A week long stay Know the special reason marathi news)


का वाढतेय मुंबईतील थंडी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टर्न डिस्टर्बन्स (western disturbances) आल्यानंतर थंडीचा जोर वाढताना दिसतोय. इराण, इराक अफगाणिस्तानातून वेस्टर्न डिस्टर्बन्स येतात. त्याचा परिणाम दिसून येत आहेत. डिस्टर्बन्स कालावधीत त्याठिकाणी पाऊस पडताना दिसतो. याच कालावधीत जम्मू-काश्मीर, लेह, लडाखमध्ये बर्फवृष्टी (Snowfall) होताना दिसते. त्यामुळे थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी भरल्याचं दिसून येत आहे.


गेल्या काही वर्षापासून राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अशात परिस्थिती दवबिंदू गोठल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 10 दिवस महाराष्ट्रालाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागने (IMD) वर्तविला केला आहे.


आणखी वाचा - Heart Attack In Cold | बोचरी थंडी ठरणार जीवघेणी, थंडीमध्ये हार्टअटॅकचा धोका


दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे थंडी वाढणार (Winter News) आहे. नाशिकसह नागपूर, पुणे या ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. तर मुंबईचा पारा (Mumbai Weather Update) देखील येत्या काही दिवसात 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.