मुंबई : ठाण्यातील मुंब्रा बायपास रस्त्याची डागडुजी पुन्हा एकदा लांबणीवर पडलंय. पुरेशी तयारी नसल्यानं आता हे काम  तीन दिवसांनी म्हणजे आणखी 27 एप्रिल रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. याआधीही मुंब्रा बायपासच्या डागडुजीचं काम दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने मुहूर्त काढल्यानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुरुस्तीच्या कामाचा परिणाम ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. मार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये,यासाठी माहिती पत्रके आणि टोकनचे वाटप जेएनपीटीकडून वाहन चालकांना केले जाणार आहे. यामध्ये वाहतुकीचा मार्ग, वाहतुकीची वेळ अशी माहिती असणार आहे. दरम्यान,टोकनवर दिलेल्या वेळेचे पालन न करण्यावर कारवाई केली जाणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठी देखील अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात. या सर्वांना 2 महिने याचा फटका बसणार आहे. वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहने वळवली आहेत. मुंब्रा व्हाया जंक्शन ते रेतीबंदर असे 7 किलो मीटर रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. 



दोन महिने प्रवाशांची अडचण 


हा रास्ता मुख्यत: जेएनपीटी कडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. सोबत ठाणो,कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठी देखील चार चाकी आणि दुचाकी वाहन चालक याचा वापर करतात. या सर्वांना दोन महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहने वळवली आहेत. मुंब्रा वाय जंक्शन ते रेतीबंदर असे सात किलो मीटर रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. केवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाड्यांना सोडले जाणार आहे, त्यांना विशेष मार्किग केले जाणार आहे  याशिवाय जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे . ठाणो आणि नवी मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल, यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले . 


एकच टोल भरावा लागणार 


मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक दोन टोल भरण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे स्पष्ट करून वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा, अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


24 तास काम राहणार सुरू 


मुंब्रा बायपासच्या कामाला दोन महिन्याचा कालावधी लागणार असून ते पूर्ण करण्यासाठी 24 तास काम करण्यात येणार आहे. यामध्ये डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे आणि बेअरिंगचे काम करण्यात येणार आहे पावसापूर्वी हे काम संपवावे, अशा सूचना पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.