मुंबई : कोरोनाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारही तितक्याच ताकदीने या आजाराला भिडत आहेत. पंतप्रधान मोदींनी पुढचे २१ दिवस देशात लॉकडाऊन जाहीर केलाय. तसेच जीवनावश्यक वस्तू कमी पडणार नाहीत याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातही याचे काटेकोर पालन केले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुंबई महानगर पालिकेने देखील महत्वाचे पाऊल उचलले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील घराघरांमध्ये जाऊन कोरोनाची चाचणी केली जात आहे. बीएमसीने यासंदर्भात हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. जर कोणाला कफ, ताप, श्वसनास अडचण, बेचव अशी लक्षणे जाणवत असतील तर या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


अशी लक्षणे आढळल्यास पालिकेचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन तपासणी करणार आहेत. ०२२-४७०८५०८५ हा नंबर पालिकेने जारी केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांशी संवाद साधू शकणार आहात. 



तसेच तुमच्याकडून रक्ताची चाचणी देखील घरी येऊन घेण्यात येईल आणि जवळच्या अधिकृत लॅबशी संपर्क साधला जाईल असेही पालिकेने सांगितले आहे.