चालत्या बसमध्ये कोयत्यानं वार करून तरुणाची हत्या
आरोपी अजित कान्हूरकर फरार
खेड, पुणे : धक्कादायक बातमी पुण्याच्या खेडमधून.... खेडमध्ये चालत्या एसटी बसमध्ये हत्या करण्यात आलीय. चालत्या एसटीमध्ये कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आलीय. एका मुलीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अजित कान्हूरकर याच्याविरोधात मुलीच्या भावानं तक्रार केली होती. पण पोलिसांनी अजितला अटक केली नाही.
मोकाट अजित आणि तक्रारदार मुलीचा भाऊ दावडी राजगुरूनगर या एसटीत बसले होते. एसटी निम्म्या रस्त्यात आल्यावर अजितनं या तक्रारदारावर कोयत्यानं वार करत त्याचा खून केला.
या घटनेनंतर सध्या राजगुरुनगर पोलीस स्थानक परिसरात प्रचंड तणाव आहे... तर आरोपी अजित कान्हूरकर फरार आहे.