वाल्मीक जोशी, झी मीडिया, जळगाव  : जळगाव शहरातील गोलाणी मार्केट इमारतीच्या तिसऱ्या मजल्या वरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. सोमवारी ही घटना घडली होती. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृत तरुणाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत तरुणांनी आत्महत्या केली नसून इमारतीवरुन ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्हीत हत्येचा हा थरार कैद झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृत तरुणाच्या मित्रांनीच हत्या केल्याचं समोर आलं आहे. 


दोन दिवस पूर्वी जळगाव शहरातील रहिवासी असलेला मुकेश राजपूत या तरुणाचा गोलाणी मार्केट मधील तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यु झाल्याची घटना सामोर आली होती. यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.


मात्र मयत मुकेश याचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी इमारतीवरील सीसीटीव्ही तपासले. यात मयत मुकेश याचा मृत्यू त्या दिवशी गोलाणीमार्केटमध्ये तो दोन तरुणाच्या सोबत असल्याचं दिसून आलं. त्याचवेळी दुसऱ्या कॅमेरात दोन तरुण मुकेशला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून देत असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.


अमर उर्फ लखन शांताराम बारोट, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे आणि निखिल राजेश सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. मुकेश आणि तीन आरोपी गोलाणी मार्केट इमारतीत पार्टी करत होते. यावेळी अमर आणि पराग यांचा परागशी वाद झाला. रागातून अमर आणि परागने मुकेशला तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिलं. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला.