प्रविण नलावडे, विरार : अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची तिच्या आई, वडील आणि मावशीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघड झाली आहे. या हत्येनंतर सर्वांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचं हे राक्षसी कृत्य अखेर उघड झाले आहे.


मुलीची कृरपणे हत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांच्या ताब्यात असलेल आणि स्वताचा तोंड लपवणारे राक्षेसी प्रवृतीचे वडील अंबाजी भेकरे, मिनाक्षी भेकरे आणी माधुरी शिंदे. स्वत:च्याच मुलीची या तिघांनी अतीशय कृरपणे हत्या केली. अकरा वर्षांची सानिया या तिघांच्या राक्षसी वृत्तीची बळी ठरली. 


दोन दिवसांपासून शौचासही त्रास


गेल्या काही दिवसांपासून सानिया पोटदुखीच्या आजारानं त्रस्त झाली होती. त्यात दोन दिवसांपासून तिला शौचासही त्रास व्हायला लागला. त्यामुळे तिला दवाखान्यात नेलं मात्र काहीच फरक पडला नाही. मात्र शनिवारी रात्री तिच्या आईच्या अंगात वारं आलं. 


उपचाराच्या नावाखाली भयानक प्रकार


सानियावर मीच उपचार करणार असं सांगत तिनं सानियाला अघोरी पद्धतीने कवटाळले त्यानंतर तिघांनी तिला निर्दयीपणे पकडलं आणि तिच्या पोटात आणि गुप्तांगात हात घातला. या प्रकारामुळे सानियाचा जागीच गुदमरुम मृत्यू झाला.


मुलीचा खून लपवण्यासाठी...


हा खून लपवण्यासाठी तिला या नराधमांनी विरारच्या संजिवनी रुग्णालयात दाखल केले. पण त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. त्यानंतर वडील अंबाजी भेकरे यांनी विरार पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन विरारच्या प्राथमीक उपजिल्हा रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले.


डॉक्टरांना आला संशय


तोंडातील, गुप्तांमतील जखमावरुन मुलीची हत्या झाली असल्याचा डॉक्टरांनी संशय डॉक्टरांना आला. त्यांनी शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवला.आणि या घटनेला वाचा फुटली. 


आई-वडिलांसह मावशीला अटक


या सर्व घटनेवरुन विरार पोलिसांनी संगनमतातून हत्या, पुरावा नष्ट करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आई मिनाक्षी, वडील अंबाजी आणी मावशी माधुरी या तिघांनाही अटक केली आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जनार्धन परबकर यांनी दिली.