धक्कादायक! बीडमध्ये शुल्लक कारणावरुन तरुणाचा खून; घटनास्थळीच उभा होता आरोपी
या घटनेनंतर मारेकरी हा घटनास्थळीच उपस्थित होता
बीड : शुल्लक कारणावरुन दिवसाढवळ्या एका तरूणाचा दगडाने ठेचून निर्घूणपणे खून केल्याची बीडमध्ये घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खंडेश्वरी रोड परिसरामध्ये मंगळवारी दुपारी एका तरुणाला काही तरुणांनी बेदमपणे मारहाण करत खून केला. या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर मारेकरी हा घटनास्थळीच उपस्थित होता. अद्याप खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.
हा खून नशा करण्यावरुन झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी हा घटनास्थळावरच उभा होता असेही सांगण्यात आले आहे.