पुणे : सीबीआयने टाकलेल्या छाप्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुस्लिम सहकारी बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी तक्रारदार संचालकांनी केलीय. नोटबंदीच्या काळात बँकेत आर्थिक अपहार केल्याचा आरोप इनामदारांवर आहे. 


बँकेच्या 9 अधिका-यांवर गुन्हा दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकऱणी सीबीआयने बँकेची कॅशबुक्स ताब्यात घेऊन बँकेच्या 9 अधिका-यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुदृढ असली तरी अध्यक्षांकडून गैरकारभार सुरू असल्याच्या तक्रारी बँकेच्याच काही संचालक आणि सभासदांनी यापूर्वी केल्या आहेत. 


या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष इनामदार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना निलंबित करावं अशी मागणी तक्रारदारांनी केलीय. इनामदार यांनी मात्र हे आरोप फेटाळेत. आपल्या विरोधातील तक्रार राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलंय. ज्या संचालकांना कर्ज देण्यास विरोध केला त्यांच्याकडूनच हे आरोप करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.