MVA Morcha Mumbai Aaditya Sanjay raut viral video : महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत  महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला. या मोर्चामध्ये तिन्ही पक्षाचे सर्व नेते सहभागी झाले होते. यामधील ठाकरे गटाचे संजय राऊत (Samjay Raut), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Maha Morcha) आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar Maha Morcha) या मातब्बर नेत्यांची भाषणे झालीत. अशातच सोशल मीडियावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Aaditya Thackeray & Sanjay Raut Viral Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भर स्टेजवर सर्वांना किस्सा कुर्सी का पाहायला मिळाला. खासदार संजय राऊत स्टेजवर आले. त्यावेळी स्टेजवर आदित्य ठाकरेंसह सर्व मान्यवर बसले होते. राऊत स्टेजवर येताच आदित्य ठाकरेंनी त्यांना जवळ घेतलं, आदित्य ठाकरेंनी स्वतःची खुर्ची संजय राऊतांना दिली.  स्वतःच्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. राऊत आदित्य ठाकरेंच्या खुर्चीवर बसायला नकार देत होते.  



आदित्य ठाकरेंनी मात्र अक्षरशः राऊतांचा हात ओढून खुर्चीच्या जवळ आणलं आणि राऊतांना स्वतःच्या खुर्चीवर बसवलं. आदित्य ठाकरे स्वतः दुसरी खुर्ची आणेपर्यंत उभे राहिले. आदित्य ठाकरेंती विनम्रता पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 


भाषणादरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार याचा मुहूर्त सांगितला आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी (SanjayRaut) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरूनही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. (Sanjay Raut on Shinde Fadnavis Goverment)


या मोर्चाने इशारा दिला आहे, शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. दिल्लीही दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र पेटलाय. ही ठिणगी पडली आहे. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? असा सवाल करत राऊतांनी टीका केली आहे.