मुंबई : यापुढे एन ९५ मास्क किंवा कोणताही मास्क एका ठराविक किंमतीतच विकावे लागेल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगिले.  याबाबत ४ दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.शासकीय तसेच खासगी डॉक्टर्सना देखील सुरक्षा इंशुरन्स कवच आहे. आयएमएची मागणी मान्य करण्यात आली. खासगी डॉक्टरांनी आणखीन ज्यास्त रुग्णसेवेसाठी पुढे यावे असेही टोपे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात आरोग्याकडे ज्यास्त लक्ष दिलं जात मात्र आपल्याकडे आरोग्य सुविधांकडे यापूर्वी दुर्लक्ष होत होत. आपण रस्ते किंवा अन्य विकास कामांकडे आपल्यात यापूर्वी काम होत होत असे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले. पण कोविडमुळे आरोग्य सुविधेसाठी जास्त काम करावं लागलं असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले.



मृतांची संख्या ५० हजारावर


भारतात कोरोनामुळे गमावलेल्या नागरिकांचा आकडा हा ५० हजारच्या पार गेला आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी मृतांचा आकडा कमी असला तरीही जगाच्या तुलनेत भारतातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. १७ ऑगस्ट रोजी ५० हजार मृतांचा आकडा पार केला आहे. 


जॉन्स हॉपकिन्स युनिर्व्हसिटी सेंटर फॉर सिस्टम साइंस एण्ड इंजिनिअरिंग (JHU CSSE) यांनी ही आकडेवारी शेअर केली आहे. जगात तीन देश असे आहेत जिथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे. अमेरिकेत १,७२ लाख, ब्राझीलमध्ये १.०७ लाख आणि मेक्सिकोमध्ये ५६,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. 


भारतात कोरोनामुळे पहिला बळी हा १२ मार्च रोजी झाला आहे. सौदी अरबमधून आलेल्या कर्नाटकमधील ७६ वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. १० हजारांचा आकडा पार करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागला. मात्र अखेरच्या १० हजार रुग्णांचा मृत्यू १० दिवसांत झाला.