Nagaland Election Results 2023: महाराष्ट्रात एकीकडे कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा सुरु आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांचा विजय झाला असून, चिंचवडमध्ये मात्र भाजपाच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) विजयी झाल्या आहेत. कसब्यात रवींद्र धांगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विजयानंतर काँग्रेस (Congress), शिवसेनेसह (Shivsnea) राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) जल्लोष करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडे आनंदोत्सव साजरा कऱण्याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे नागालँडमध्ये (Nagaland) पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा जिंकल्या असून प्रमुख विरोधीपक्ष ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये सात जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याचं स्पष्ट आहे. नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा असून भाजपा आणि एनडीपीपी युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट आहे. भाजपा आणि एनडीपीपीला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये एनडीपीपीला २५ तर भाजपाला १२ जागांवर यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान ५ जागांवर पक्षाला दुस-या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. 


आठवले गटाचे दोन उमेदवार विजयी 


केंद्रात मंत्रीपद असून महाराष्ट्रात विधानसभेची एकही जागा न जिंकलेल्या आरपीआय आठवले गटानही नागालँडमध्ये २ जागा जिंकल्या आहेत. तसंच 4 जागांवर दोन नंबरची मतं मिळवली आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मुंबईत हा विजय साजरा केला. 


नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- 2 मतदारसंघात आरपीआयचे उमेदवार इम्तिचोबा ४०० मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांना  ५५१४ मतं मिळाली. तसंच नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग विजयी झाले असून त्यांनी ५१५१ मतं मिळाली आहेत. 


काँग्रेसला मात्र नागालँडमध्ये यश आलं नाही. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. दरम्यान लोकजनशक्ती पक्षाला आणि नागा पिपल फ्रंटला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. तसंच ४ जागी अपक्ष निवडून आले आहेत.