दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..
Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे.
Nagpur Death: मुलं लहान असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पालकांचे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडेही दुर्लक्ष झाल्यास मुलं काय करतील हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत 10 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे.
संदीप पराते हे पत्नी दोन मुलांसह सद्गुरु नगर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. संदीपची पत्नी म्हणजेच अनयची आई दुपारच्या सुमारास झोपली होती. 10 महिन्यांचा अनया हा रांगत रांगत घरासमोरील बादली पर्यंत पोहोचला. त्याने बादलीच्या पाण्यात आपलं तोंड टाकलं. बदलीच्या पाण्यात त्याचं तोंड बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. थोडा वेळ याबद्दल कोणालाच कळाले नाही. काही वेळाने शेजारची मुलगी अनयसोबत खेळायला आली. त्यावेळेस अनयचे तोंड तिला बादलीत दिसले. हा प्रकार पाहून तिने आरडा ओरडा केला.
मुलाच्या आरडा ओरडा करण्याने संदीपच्या पत्नीला जाग आली. यानंतर अनयला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. त्यावर डॉक्टरांनी काही तास उपचारही केले. मात्र त्याला यश मिळू शकले नाही. अन त्यात चिमुकल्या अनयचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
संदीप परते हे रामटेक तालुक्यातील असून खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांना एक पाच वर्षाचा आणि दहा महिन्याचा अनय अशी दोन मुले होती. आनयच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात आणि कुटुंबात मात्र शोक कडा पसरली आहे. दरम्यान या घटनेचा सविस्तर तपास सुरु असल्याची माहिती पारडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी सांगितले.
गोंदियात फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी
दुसऱ्या एका घटनेत गोंदियातल्या एका तरुणाने आयएएस अधिकारी असल्याचं सांगत सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट केले. फोटो एडिट करत त्या तरुणआने नरसिंगपूरचा जिल्हाधिकारी असल्याचा दावाही त्याने केला. इतकंत नाही तर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारतानाच फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. राहुल गिरी असं या तरुणाचं नाव असून तो गोंदियातला हिवाशी आहे. राहुल गिरीने मध्यप्रदेशमधल्या नरसिंगपूरच्या जिल्हाधिकारींच्या खूर्चीवर बसलेला स्वत:चा एक फोटो एडिट केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नगरसिंगपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत पोहचला. त्यानंतर राहुल गिरीचा बनाव उघडकीस आला. राहुल गिरी बीएससी उत्तार्ण आहे. त्याला आयएएस अधिकारी व्हायचंहोतं. पण त्याने तितकं शिक्षण घेतलं नाही. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोटो एडिट करून आयएएस झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत होता. यासाठी तो एका एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत होता.