नागपूर : नागपुरातील 'आपली बस' या शहर बससेवेची जबाबदारी असलेल्या रेड बसची सेवा आज सकाळपासून बंद आहे. त्यामुळे सकाळपासून नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सकाळपासून एकही रेड बस रस्त्यावर धावत नसल्यानं प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसची सेवा पुरविणा-या तिन ऑपरेटरर्सची थकबाकी न दिल्यानं त्यांनी रेड बससेवा आज सकाळपासून बंद ठेवली आहे. 


थकीत रक्कम 45 कोटींवर 


 बससेवेतील 320 बसेस डेपोत उभ्या आहेत. शहर बससेवा पुरवणा-या तिन्ही ऑपरेटर्सची 45 कोटींची थकबाकी महापालिककडे आहे. गेल्या महिन्यातही एक दिवस पूर्णवेळ शहर बससेवा ठप्प पडली होती. तेव्हा दीड कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली होती.


त्यानंतर सेवा सुरु झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा तीन बससेवा ऑपरेटची थकीत रक्कम 45 कोटींवर गेलीय. थकीत रकमेसाठी ऑॅपरेटरर्सनं आतापर्यंत अनेकवेळा पत्र पाठविलं असून इशाराही दिला होता.