‘अधिवेशन संपण्यापूर्वी बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत’
बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
नागपूर : बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
अजित पवारांचा प्रश्न
बोंड अळीवरील लक्षवेधीला उत्तर देताना कृषीमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरकार बोंड अळीग्रस्त शेतक-यांना काय मदत देणार आहे असा प्रश्न, अजित पवारांनी विचारला होता. विम्याची रक्कम मिळेल हे सरकारने सांगू नये, सरकार काय मदत देणार आहे याची माहिती द्यावी अशी विचारणा अजित पवारांनी केली होती.
बोंडअळीमुळे शेतकरी हैराण
राज्यभरातील शेतकरी कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे देशोधडीला लागला आहे. अनेकांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यावर राज्य सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याने विरोधक चांगलेच आक्रामक झाले आहेत.