नागपूर :  ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने नागपुरातही पेट्रोल पंपांवर चालणारी ग्राहकांची लूट उघडकीस आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने नागपुरातल्या मानकापूर परिसरात झिंगाबाई टाकळी गेट समोर इंडियन ऑइल कंपनीशी संबंधित तुली पेट्रोल पंपावर धाड टाकत दोन मशिन्स सील केल्या आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी देखील ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांसारखेच माइक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी केली जात होती.


धक्कादायक बाब म्हणजे नागपुरात चोरीचे प्रमाण ठाणे किंवा इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे समोर आले आहे... मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकण्यात आलेल्या पंपावर एका मशीन मध्ये प्रत्येक ५ लिटर मागे २०० मिलिलिटर तर दुसऱ्या मशीनमध्ये प्रत्येक ५ लिटर मागे २२० मिलिलिटर एवढी पेट्रोल चोरी होत असल्याचे समोर आले आहे.


पेट्रोलपंपांवर इंधन विक्री करताना मशीनमध्येच फेरफार केले गेल्याचे प्रकार नुकतेच समोर आले. त्यानंतर या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विविध ठिकाणच्या पेट्रोलपंपांवर छापे घातले.