नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचे प्रकरण नागपुरतून समोर आलंय. मयुरी हिंगणेकर  असे मृत तरुणीचे नाव असून ती शनिवारी तिचा मित्र अक्षय नगरधने सोबत बाईकने कोराडी मंदिरात दर्शनाला गेले होती. रात्री मित्रासोबत बाईकवरून परतत असताना मागून आलेल्या एका कारने बाईकला मागून जोरदार धडक दिली होती. त्यामध्ये मयुरीचा मृत्यू झाला होता तर अक्षय गंभीर जखमी झाला होता.अपघाताची ही दृश्ये सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू चा गुन्हा दाखल केला होता.


हत्येचा बनाव 


शनिवारी दिवसभरातील तपासात कार चालवणाऱ्या अनिकेत साळवे  नावाच्या तरुणाने हत्या केल्याचे समोर आले. अनिकेतचा भाऊ शुभम व मुयरीचे अगोदर प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसात त्या दोघात बिनसले  .त्यामुळे शुभमचा भाऊ अनिकेतने  पाठलाग करून तिचा जाणूनबुजून 
कारने धडक देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी अनिकेत साळवे आणि कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन जणांविरोधात 
हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.