`नाणार`वरून गदारोळ, विधानसभेचं कामकाज पुन्हा-पुन्हा तहकूब
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध
नागपूर : विधीमंडळात आजही नाणारचाच मुद्दा गाजतोय. विधानसभेचं कामकाज सुरु होताच गोंधळामुळे १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.. त्यानंतर कामकाजादरम्यान शिवसेना आमदार पुन्हा आक्रमक झाल्याने कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू झालं पण अवघ्या काही मिनिटांत पुन्हा एकदा कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. आजचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेविरोधातही विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. नाणारला तीव्र विरोध करत काल विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी तसेच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी थेट राजदंड पळवला होता.
विखे पाटील, काँग्रेस, नेते
- नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध
- मारुती मांजरेकर, जिल्हा राजापूर ही व्यक्ती पोलीस रेकॉर्डवर गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत, मात्र त्यांच्या नावाने भूसंपादनाला अनुमती दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे
- अश्विनी आगाशे यांनी जमिनीचे खोटे दस्ताऐवज बनवल्याची तक्रार राजापूर पोलीस स्थानकात केली आहे
- या सभागृहात काही लोकांचा नाणारला बेगडा विरोध आहे
- सर्व विषय बाजूला ठेऊन नाणारवर चर्चा व्हावी
सुनील प्रभू, आमदार, शिवसेना
- विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या आमदारांचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे
- नाणारवासियांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी
- सभागृहात असोत किंवा सभागृह बाहेर शिवसेना नाणारच्या विरोधातच
- धर्मेंद्र प्रधान मुंबईत असतांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली
भास्कर जाधव, नेते, राष्ट्रवादी
- नाणरकडे राजकीय विषय म्हणून पाहू नये
- शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी वक्तव्य केलं होतं, अणु प्रकल्प आणि रिफायनरी जगात कुठेही एकत्र नाहीत
- दोन्हीमधील हवाई अंतर १.८ किलोमीटर आहे
- अपघात झाला तर बाजूच्या जिल्ह्यांना आणि पूर्ण कोकणाला धोका आहे
- मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल असे सांगतात, पण आम्ही जिवंत राहीलो तर रोजगार मिळेल
- कोकणात प्रकल्प आले पाहिजेत पण दोन्ही प्रकल्प एकत्र करणं हे विनाशाला निमंत्रण आहे
- शिवसेनेने नियमानुसार मुद्दा मांडावा
- सरकारने हा हट्ट सोडावा- हवे तर प्रकल्प विदर्भात घेऊन जा