नागपूर : मेडिकल स्टोअरमध्येच बियर विकत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. मेयो रुग्णालयासमोरच्या कांचन मेडिकलमध्ये नियमबाह्य पद्धतीने ही बियर आणि इतर मद्यविक्री सुरू होती. गणेशपेठ पोलिसांच्या छाप्यात मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमध्ये बियरची विक्री सुरू असल्याचं उघड झालं. पोलिसांनी या मेडिकलमध्ये धाड टाकली असता ९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेडिकल स्टोअरचा संचालक निशांत गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. निशांत गुप्ता याचा नातेवाईक बियर बार चालवतो. इथलीच बियर या मेडिकल स्टोअरमध्ये विकली जात होती. अजूनही कुठे असे प्रकार सुरू आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. 


मेडिकल स्टोअरमध्ये दुपट्ट किमतीला ही बियर विकली जात होती. दुकानात ८ बॉक्समध्ये भरलेल्या ९० बॉटल सापडल्या, याची एकूण किंमत १५ हजारच्या आसपास आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या काळामध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत.