Nagpur Blast:   नागपूर जिल्ह्यातील धामणा मधील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या  स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.   तर 4 जण जखमी झालेत.  दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. तातडीनं यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तसंच ATSचं 8 ते 10 जणांचं पथकही दाखल झलंय. तर संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली. तर स्टॉक करुन ठेवलेल्या मालाचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.