अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशन असो वा पोलीस यांपासून दूरच रहातो.पोलिसांबाबत सर्वसामान्यांना मनात फारस चांगलं चित्र नाही.त्यातही ट्रॅफिक पोलीस म्हटला की मग काय नियमांकडे बोट दाखवून दंड वसूल करणारा या धास्तीनं अनेक जण त्यांना पाहून दुरूनचं वळण घेतात. मात्र पोलिसांमध्ये संवेदशीलतेच दर्शन अनेकदा दिसून येत.त्यातच प्रत्येक नागपुरातील एका ऑटोचालक आणि त्याच्या कुटुंबियांना आला.ऑटोल चालकाचा बेताची स्थिती पाहून चक्क पोलिसांनीच स्वत:च त्याचा दंड भरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरानजिकच्या कामठी परिसरात रोहत खडसे नावाचा ऑटोचालक रहातो. ऑटोमध्ये मिळणा-या सवारीतून जे उत्पन्न वा कमाई होते त्यातच त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो.मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानंतरच्या निर्बंधांमुळे रोहितची आर्थिक स्थिती पुरती ढासळली.. कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी खडसे यांचा रोजचा संघर्ष असतो. त्यात 9 ऑगस्टला सीताबर्डी येथे नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या ऑटोला पोलिसांनी चालानं केलं.


पाचशे रुपयाचा दंड लावला. त्यात अगोदरचे दोन दंडाचे पैसेही रोहित यांना भरावे लागणार असल्याचं ऑनलाईन सिस्टिममध्ये दिसून आले. हलाखीच्या परसिस्थितमुळं ही दंडाची रक्कम आपण आता भरू शकत नसल्याचं रोहित यांनी पोलिसांना सांगितलं. त्यामुळं पोलिसांना त्याचा ऑटो जप्त करावा लागला. उपजिविकेचं साधन जप्त झाल्यामुळं रोहित सुन्न झाला.



दंडाच्या पैशांकरता धावाधाव सुरु केली. मात्र कुठूनच आर्थिक मदत मिळाली नाही.अखेर 7 वर्षीय लहानग्या  मुलाच्या गुल्लकमधून पैसे घेण्याचा निर्णय जड अंत:करणाने घेतला. मुलाचा गुल्लक फोडत त्यातील चिल्लर( सुटे) पैसे घेवून पिशवीत टाकून रोहित सीताबर्डी वाहतूक कार्यलायत  पोहचला. वाहतूक पोलिसांना कुणीतरी मुद्दाम दोन हजार रुपये सुट्टे आणून आपला संताप व्यक्त करत असावा असं वाटलं.त्यामुळं वाहतूक पोलीस निरीक्षक अजय मालविय यांनी याबाबत रोहितला विचारणा केली. इतके सुटे  पैसे कोण मोजणार असा सवालही त्याला दरडावून विचारला.यावेळी रोहितनं ऑटो सोडविण्यासाठी मुलानं गुल्लक फोडून जमा केलेले पैसे दिल्याचं सांगितलं.


लहानग्या चिमुरड्याची धडपड आणि रोहितचा केविलवाणा चेहरा पाहून अजय मालविय यांचे मन पिळवटून गेलं.. त्यांना दंड वसून करून कर्त्यव्य तर पूर्ण करायचे होते. पण चिमुरड्याचं मन मोडयचं नव्हतं अशा द्विधा मनस्थितीत पोलीस निरीक्षक मालविय अडकले.अखेर मालविय यांनी रोहितच्या दंडाची रक्कम स्वत: भरली. रोहितच्या मुलाच्या गुल्लकमधील पैसे पुन्हा लहानग्या मुलाला परत केले...एरवी कठोर वाटणारे पोलीसांमधील ही संवदेशीलनचा आणि दातृत्व पाहून खडसे कुटुंबाचे डोळेही पाणावले.