नागपूर : Nagpur City bus conductor strike : शहर बससेवेतील 1800 वाहक अचानक संपावर केल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत. पगार न झाल्याने नागपूर शहर बस वाहक संतप्त झालेत आणि ते थेट संपावर गेलेत. (Nagpur City bus conductor on strike for Salary Issue) यामुळे शहर बस वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, महापालिकेच्या 'आपली बस सेवे'तील वाहकांनी केलेला संप मिटल्याचा दावा महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली बस सेवेतील 1800 वाहक आज सकाळी अचानक संपावर गेले होते. त्यांना कामावर ठेवणाऱ्या युनिटी सिक्युरिटी फोर्स या खासगी कंपनीने वाहकांचा पगार वेळेत न दिल्यामुळे वाहकांनी संप पुकारला होता. महापालिकेने संबंधित खासगी कंपनीला वाहकांच्या पगाराचा पैसा 16 तारखेलाच दिला आहे. बँकेच्या सर्व्हरमध्ये समस्या असल्यामुळे खासगी कंपनीकडून वाहकांचा वेतन त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकलेली नव्हती, असे बंटी कुकडे म्हणाले. 



आज सकाळी खासगी कंपनीने सर्व वाहकांचा वेतन त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करायला सुरुवात केली आहे. काहींचे वेतन खात्यात जमा झाले आहे. तर उर्वरित वाहकांच्या खात्यात लवकरच वेतन जमा होईल, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली. वाहकांच्या अचानक झालेल्या संपामुळे नागपूरकरांना त्रासाला सामोरं जावं लागले, यासाठी त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.


दरम्यान, वाहकांच्या अचानक झालेल्या या संपामागे भारतीय कामगार सेनेचे काही लोक कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भारतीय कामगार सेनेचे अडीच लोकं वारंवार आपली बस सेवेतील वाहक आणि चालकांना चिथावणी देत असतात. यापूर्वीही नागपुरात झालेल्या काही संप मागे त्यांची भूमिका समोर आली होती. आजच्या संपामागे शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचेचे काही नेते जबाबदार असल्याचा आरोप बंटी कुकडे यांनी केला आहे.