नागपूर : सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी मित्रपक्षांना मलईदार खाती हवी आहेत, असं सूचक विधान राऊत यांनी त्यांच्या अग्रलेखातून केलं आहे. पण संजय राऊत यांना हा साक्षात्कार कुठे आणि कसा झाला, हे मला माहिती नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्याची भूमिका आहे. महाराष्ट्राला भाजप नको आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. अशाप्रकारची निंदा नालस्त करायची गरज नाही, असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 


मित्रपक्षांनी मलईदार किंवा वजनदार खात्यांचा आग्रह सोडावा, असे या अग्रलेखातून सूचित करण्यात आले आहे. मलईदार समजल्या जाणाऱ्या खात्यातून जनतेची सेवा करता येते, असे ज्यांना वाटते त्यांची नियत साफ नाही. मदत व पुनर्वसन, आयटी, कौशल्य विकास, शालेय शिक्षण आणि आरोग्य अशा खात्यांना हात लावायला कुणी तयार नाही. ही काय खाती आहेत का? असा प्रश्न विचारला जातो. मराठी भाषा, सांस्कृतिक खात्यातही कुणी रमायला तयार नाही. गृह, नगरविकास, बांधकाम आणि पाटबंधाऱ्यावर जीवनाचे सार आहे, असे वाटत असेल तर लोकसेवा आणि राज्याचे हित या शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल, असेही अग्रलेखात म्हटले आहे.